1000+ Marathi Ukhane | मराठी उखाणे

1000+ Marathi Ukhane | मराठी उखाणे

बातम्यांचे अपडेट मिळण्यासाठी Whatsapp चॅनल जॉईन करा: Join WhatsApp
बातम्यांचे अपडेट मिळण्यासाठी Telegram चॅनल जॉईन करा: Join Telegram
Join Now

1 ) अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी,
…..रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती.

2 ) साडी घालते फॅशनची पदर घेते साधा, …..राव माझे कृष्ण मी त्यांची राधा.

3 ) काचेच्या ग्लासात चक चक दही, …..रावांच्या अंगठीवर माझी इंग्लिश सही.

4 ) उखाणा घेते,आशीर्वाद द्यावा, …..रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा.

5 ) खान तशी माती, …..राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती.




6 ) अंगणात वृंदावन,वृंदावनात तुळस, …..रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.

7 ) हिमालय पर्वतावर शंकर-पार्वताची जोडी, …..रावांमुळे आली आयुष्याला गोडी.

8 ) गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी, …..रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी.

9 ) सायंकाळच्या वेळी, दिवा लावून नमस्कार करते देवाला ,…..रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला.

10 ) महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, …..रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.




11 ) श्री. विष्णूची पूजा असते वैकुंठ चतुर्थीला, …..रावांचे नाव घेऊन दुर्वा वाहते श्री. गणेश चतुर्थीला.

12 ) लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणे, …..रावांच्या घरची झाली मी गृहिणी.

13 ) सूर्याला कोणी म्हणतात रत्नाकर, कुणी म्हणतात भास्कर,…..राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर.

14 ) विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, …..रावांच्या छायेत झाले मी हे भाग्यवंत.

15 ) लक्ष्मी मातेला नमन करून मिळो सुख आणि ऐश्वर्य, …..राव देतात मला नेहमीच प्रेरणा आणि धैर्य.




16 ) माहेरी कन्या होते लाडकी आई वडिलांची आणि बहीण लाडक्या भावाची, …..रावांच्या नावाने झाले प्रेमळ सून सासू-सासर्‍यांची.

17 ) चाफ्याची कळी फुलली बागेत वास पसरला असंमतात, ….. राव नेहमीच असतात माझ्या हृदयात.

18 ) मोत्याची नात सोन्याच्या तारेने गुंफली, …..रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

19 ) शंकरासारखे पिता आणि पार्वती सारखी माता, ….‌.रावांसारखे पती मिळाले स्वर्ग आला होता.

20 ) लक्ष्मी शोभते धनसंपत्ती ने विद्या शोभते विनयेन, …..रावांचे नाव घेऊन मी लक्ष्मीपूजन करते.

21 ) फुला इतकीच मोहक दिसते कमळाची कळी,…..रावांचे नाव घेते पूजनाच्या वेळी.

22 ) गीतात जसा भाव, फुलात तसा सुगंध,…..रावांबरोबर जुळले मनाचे रेशमी बंध.

23 ) प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळले मन,…..राव आहेत माझे नंबर वन.

24 ) दवबिंदूंनी चमकतो फुला पानांचा रंग,सुखी आहे संसारात, ……रावांच्या संग.

25 ) अंतर पाटावरील स्वस्तिक मांगल्याची खूण,…..रावांची आणि माझे जुळले छत्तीस गुण.




26 ) नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान, …..राव आहेत माझा जीव की प्राण.

27 ) मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ, …..रावांमुळे माझ्या जीवनाला आहे अर्थ.

28 ) देवा ब्राह्मणाच्या साथीने वचने घेतले सात जन्माची आणिपुढील आयुष्याला सोबती मिळावी …..रावांच्या प्रेमाची.

29 ) ऊन पाऊस ऊन पाऊस असा चाललाय निसर्गाचा खेळ,…..रावांबरोबर जुळलाय आयुष्यभराचा मेळ.

30 ) विवाह म्हणजे सुरुवात एका नवजीवनाची,….. रावांचे नाव घेऊन जाणीव ठेवून स्त्री कर्तुत्वाची.

marathi ukhane/सोपे उखाणे

31 ) हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार,…..रावांसोबत मी वयाची शंभर गाठणार.

32 ) चंद्राभोवती तारकांनी धरलं गोल रिंगण,……रावांच्या नावाने बांध गळ्यात मंगळसूत्र.

33 ) हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,…..रावांमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

34 ) जीवनरुपी काव्य दोघांनी वाचावे,…..रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी.

35 ) नव्या नव्या संसाराला नाजूक गोड अनुभवही हवा,…..राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा.




36 ) श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक,…..रावांच्या नावाने बेल वाहिले एक.

37 ) कळी उमलेली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा, भारी कुंकुम टिळा रेखित …..रावांच्या नावाचा.

38 ) आभाळ भरले चांदण्यांनी चंद्र मात्र एक,….. रावांचे नाव घेते ….‌घराण्याची लेक.

39 ) पानोपानी फुल फुलावे रंग गहिरे असावे,…..रावांच्या सहवासात सुख माझे हसावे.

40 ) लक्ष्मी बसते कमळावर सरस्वती बस ते मोरावर,…..रावांचे तेज माझ्या कपाळाच्या कुंकवावर.

41 ) गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेंहदीचा रंग,…..रावांचे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग.

42 ) पुरुष म्हणजे सागर,स्त्री म्हणजे सरिता,…..रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता.</blockquote

43 ) शंकराला भारतात त्रिदळी पान,…..रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

44 ) या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी,…..रावांचे नाव घेते आमच्या लग्नाला चंद्र सूर्य आहेत साक्षी.

45 ) हिरवीगार झाडं नदीच्या काठी, …..रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी.




46 ) कपाळी लावली टिकली चंद्रकोर,…..रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर.

47 ) तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस, …..राव हीच माझी पहिली चॉईस.

48 ) नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे, …..रावांना शेवटी म्हणायचे..

49 ) घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणिनेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते, माझी नि,…..रावांची जोडी.

50 ) लाल मनी तोडले काळे मनी जोडले,……रावांसाठी माहेरघर सोडले.

51 ) महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून,…..रावांचे नाव घेते सर्वांचे मान राखून.

52 ) तार गेली, पत्र गेले, नंतर मोबाईल आले,…..रावांनी लग्न करून मी सौभाग्यवती झाले

53 ) लक्ष्मी माते वंदन करते मनी श्रद्धेचे बळ,…..रावांच्या संसारी दे समृद्धीचे फळ.

54 ) पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध,…..राव माझ्या आयुष्यात आल्याने भेटला मला आनंद.




55 ) सातला म्हणतात इंग्रजीमध्ये सेवन,…..रावांसाठी शिकेन मी सर्व जेवण.

56 ) कळी असेल फुल उमले मोहरून येईल सुगंध,…..रावांच्या सोबती गवसेल जीवनाचा आनंद.

57 ) रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,…..रावांचे नाव घेते असू द्या लक्षात.

58 ) पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,…..रावांच्या जिवन रथाची मी झाले सारथी.

59 ) सुगंधा न्याल्या दिशा धुंद दाही,…..रावांचे नाव हळूच ओठी येई.

60 ) शब्दा वाचूनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले, …रावांच्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले.

marathi ukhane for Female| मराठी उखाणे |महिलांचे उखाणे

marathi ukhane

1 ) गोकुळाचा संसार, सारेच आहेत हौशी,…..रावांचं नाव घेते मी लग्नाच्या दिवशी.

2 ) महादेवाच्या पिंडीवर खरबुजाची फोड,…..रावांचे बोलणे साखरेपेक्षाही गोड.

3 ) नीलवर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा,……रावांनी मला सौभाग्याचा गजरा.

4 ) घराला असावे अंगण अंगणात असावी तुळस,…..रावांचे नाव घ्यायला मला नाही बाई आळस.

5 ) नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचं,…..रावांना शेवटी अहोच म्हणायचं.

6 ) माहेरच्या” अंगणात वाढली ही संस्काराची तुळस,…..रावांचे नाव घेत मी गाठीन मानाचा कळस.

7 ) आई बाबा आशीर्वाद द्यावा,…..रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा.

8 ) उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,…..रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिलं पाऊल.

9 ) मराठी भाषेत प्रसिद्ध आहेत अलंकार उपमा व उत्प्रेक्षा,……राव सुखी राहो हीच माझी अपेक्षा.

10 ) वर्तमानपत्रात छापून आली वार्ता,…..रावांचं नाव घेते फक्त तुमच्याकरता.




11 ) मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,…..रावांचे हेच रुप मला फार आवडले.

12 ) पौर्णिमेच्या चंद्रभोवती चांदण्याची दाटी,…..रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी.

13 ) मोत्याचे मनी घरभर पसरले,…..रावांसाठी मी माहेर विसरले.

14 ) माहेर सोडताना डोळे झाले ओले,……रावांच्या संसारात अश्रूंची झाली फुले.

15 ) यशाच्या शिखर काढण्यासाठी तुडवावी लागते खडतर वाट,…..रावांचं नाव घेऊन सोडते मी गाठ.

16 ) कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

17 ) यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

18 ) गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

19 ) वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

20 ) बारीक मणी घरभर पसरले,…… साठी माहेर विसरले.

21 ) पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.




22 ) लग्नात लागतात हार आणि तुरे,…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

23 ) चंदनी पानात मुग्ध कळी हसली,…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

24 ) रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

25 ) परसात अंगण, अंगणात तुळस,…. नाव घ्यायचा मला नाही आळस.रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,

26 ) …. च्या साथीने आदर्श संसार करीन. हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

27 ) इंग्रजीत म्हणतात मून,…. चंं नाव घेते …. ची सून.

28 ) सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

29 ) आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,…. चं नाव घेते कुंकू लावून.

30 ) चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.




31 ) चांदीचे जोडवे पतीची खूण,…. रावांचे नाव घेते …. ची सून.

32 ) आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

33 ) आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.

34 ) बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

35 ) वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!

36 ) अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!

37 ) खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

38 ) कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती

39 ) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला

40 ) मंदिरात वाहते, फुल आणि पान,… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान

मराठी उखाणे |महिलांचे उखाणे

marathi ukhane

41 ) लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

42 ) गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

43 ) डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

44 ) कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,… रावांचे नांव घेते, सारे जण बसा

45 ) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा

46 ) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

47 ) पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

48 ) मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

49 ) माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

50 ) संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला




51 ) अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,… रावांच नांव घेताना, कसला आला आळस

52 ) पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

53 ) ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

54 ) लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

55 ) पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार

56 ) आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,… राव हेच माझे अलंकार खरे

57 ) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी

58 ) सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

59 ) दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,…चे नाव घेते तुमच्या साठी!

60 ) श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन




61 ) घातली मी वरमाला हसले… राव गाली,थरथरला माझा हात लाजेने चढली लाली

62 ) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,घडविले दैवांनी… रावांना जीव लावून

63 ) हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत

64 ) राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

65 ) पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन

66 ) चांदीचे जोडवे पतीची खूण,.. रावांचे नांव घेते,… ची सून

67 ) गुलाबाचे फुल दिसायला ताजे,… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे

68 ) डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले

69 ) चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

70 ) नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे




71 ) स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी

72 ) …रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

73 ) तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले

74 ) मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,… रावांचे हेच रूप मला फार आवडले

75 ) मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

76 ) शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

77 ) प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची

78 ) चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

79 ) नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,… रावांचा स्वभाव आहे फारच उदार

80 ) करवंदाची साल चंदनाचे खोड,… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

140 ) करवंदाची साल चंदनाचे खोड,… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

Marathi Ukhane For Men |नवरदेवासाठी मराठी उखाणे

marathi ukhane

1 ) फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,…. च्या नादाने झालो मी बेभान.

2 ) कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,…… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

3 ) परातीत परात चांदीची परात,…. लेक आणली मी …. च्या घरात.

4 ) …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.

5 ) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,…. चे नाव घेतो ऐका देऊन कान.

6 ) संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी …. म्हणते मधुर गाणी.

7 ) श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा.

8 ) पाच बोटातून होते कलेची निर्मिती, …. वर जडली माझी प्रीती.

9 ) खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.

10 ) ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.




11 ) वादळ आलं,पाऊस आला,मग आला पूर… हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

12 ) केसर दुथात टाकलं काजू,बदाम, जायफळ,हिचं नाव घेतो,वेळ न घालवता वायफळ.

13 ) तू पुण्याची मिसळ,मी मुंबईचा वडापाव,लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

14 ) चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

15 ) अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.

16 ) काट्यात काटा गुलाबाचा काटा,हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

17 ) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,…. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

18 ) आंबा गोड, ऊस गोड,त्याहीपेक्षा अमृत गोड,…..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

19 ) काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

20 ) हा दिवस आहे आमच्याकरिता खास,…. ला देतो गुलाबजामचा घास




21 ) एक होती चिऊ आणि एक होता काऊ …__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ

22 ) निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे …__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे

23 ) आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे …__ च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे

24 ) आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा …__ च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!

25 ) प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

26 ) प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा …शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा

27 ) एका वर्षात, महिने असतात बारा…__मुळे वाढलाय, आनंद सारा!

28 ) ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा

29 ) गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा…__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

30 ) लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त … __आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !